Ambegaon Heavy Rain: आंबेगावच्या आदिवासी भागात अतिवृष्टीचा कहर! रस्ते-पूल वाहून गेले, भीमाशंकर व जुन्नर मार्ग बंद

Dimbhe Dam water level latest News: आंबेगावच्या आदिवासी पट्ट्यात मुसळधार पावसाने रस्ते, पूल वाहून; घोड व बुब्रा नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला, भीमाशंकर-जुन्नर मार्ग बंद
Flood Fury in Ambegaon: Landslides, Washed-Out Roads Cut Off Tribal Villages

Flood Fury in Ambegaon: Landslides, Washed-Out Roads Cut Off Tribal Villages

esakal

Updated on

-चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव: आंबेगावच्या आदिवासी भागातील आहुपे,भीमाशंकर व पाटण खोऱ्यात रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक छोटी-मोठी पूल, रस्ते वाहून गेल्यामुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुशिरे ते भोईरवाडी हा रस्ता घाटातील दरड कोसळल्यामुळे बंद झाला होता. घोडेगाव पोलिसांनी सकाळी हा रस्ता राडाराडा काढून सुरू केला. घोडेगाव भीमाशंकर रस्ता व घोडेगाव जुन्नर रस्ता बंद करण्यात आलेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com