आंबेगावातील शेतकऱ्यांची पावसाने उडाली तारांबळ 

nirgudsa
nirgudsa

पुणे : आंबेगाव तालुक्यात आज सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतात पाणी साचले. परिसरातील ओढ्यानाल्यांना पूर आला. या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.  

निरगुडसर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील चांडोली, खडकी, पिंपळगाव, बेलसरवाडी परिसरात बुधवारी (ता. १) पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेती व परिसर जलमय झाला.

निरगुडसर परिसरात बुधवारी सकाळपासूनच आकाशात काळे ढग जमा झाले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जोरदार झालेल्या पावसाने शेती परिसरात पाणी साचले. कळंब, चांडोली, खडकी परिसराला पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी ओढे भरून वाहिले. या पावसाने शेतात पाणी साचले. टोमॅटो, फ्लॅावर, धना, मेथी, जनावरांच्या चारा पिकांचे उत्पादन घेतलेल्या शेतक-यांची धावपळ उडाली. साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी शेतक-यांना कसरत करावी लागली.  निरगुडसर, थोरांदळे, रांजणी, जाधववाडी, वळती, नागापूर, जवळे, भराडी आदी परिसरात समाधनकाराक पाऊस झाला.

मंचर : आंबेगाव तालुक्यात अवसरी खुर्द गाव व परिसरात आज सायंकाळी तब्बल पाऊण तास मुसळधार पाऊस झाला. गाव वाड्या वस्त्यावरील सर्व रस्त्यावरून पाणी वाहत होते. पाणी साचल्याने शेत जमिनीला तळ्याचे स्वरूप आले होते. ओढ्या नाल्यांना पूर आला होता. 

आज सकाळपासून हवेत प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे पाऊस होईल, असा अंदाज शेतकरी व नागरिकांना आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून शेतकऱ्यांनी शेतामध्ये साठवलेल्या कांद्यावर संरक्षणासाठी ताडपत्री व प्लॅस्टिक कागद पसरले होत्या. संध्याकाळी सव्वा पाच वाजता पावसाला सुरुवात झाली. टेमकर मळ्यातील अनेक घरात रस्त्यावरून वाहणारे पाणी शिरले. तसेच मका, काकडी, बीट भाजीपाला व तरकारी पिकांमध्येही पाणी साचले आहे. तीन वर्षातील हा सर्वात मोठा पाऊस होता, अशी माहिती शेतकरी नबाजी टेमकर यांनी दिली.

अवसरी फाटा, शिंदे मळा, टेमकर वस्ती, वायाळ मळा, कराळेवाडी, खेडकर मळा, अभंग मळा, भोरवाडी, भोर मळा, दिंडा फाईन या भागात पावसाचा जोर अधिक होता. पण, अवसरी खुर्दच्या सरहद्दीवर असलेल्या मंचर शहराकडे पावसाने पाठ फिरवली .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com