
Uruli area flooded due to heavy rainfall
esakal
उरुळी कांचन : पावसामुळे पूर्व हवेलीतील उरुळी कांचनसह परिसरात शेतमाल, नर्सरी, फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच, काही गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळित झाले. गेल्या दोन दिवसांत ७५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे सोरतापवाडी, अष्टापूर, टिळेकरवाडी, शिंदवणे, वळती या गावांतील शेतमालाला, तसेच नर्सरी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.