बारामतीच्या जिरायती भागात वादळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

विजय मोरे
Monday, 20 April 2020

बारामती तालुक्याच्या जिरायती भागात (रविवारी) रात्री आठच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. प्रंचड वेगाने आलेल्या वादळी वाऱ्याने परिसरातील मोठमोठी झाडे उमळून पडली. तसेच मका, कडवळ, बाजरी आदी पिकांसह शेडनेट, वीजे खांब भुईसपाट झाल्याने नुकसान झाले.

उंडवडी - बारामती तालुक्याच्या जिरायती भागात (रविवारी) रात्री आठच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. प्रंचड वेगाने आलेल्या वादळी वाऱ्याने परिसरातील मोठमोठी झाडे उमळून पडली. तसेच मका, कडवळ, बाजरी आदी पिकांसह शेडनेट, वीजे खांब भुईसपाट झाल्याने नुकसान झाले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिरायती भागातील कारखेल, उंडवडी सुपे, सोनवडी सुपे, गोजुबावी, उंडवडी कडेपठार, जराडवाडी, बऱ्हाणपूर, जळगाव सुपे, अंजनगाव आदी परिसराला  रविवारी रात्रीच्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. अचानक वीजेच्या कडकडाटसह वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. वादळी वारे व पाऊस सुरु झाल्यानंतर परिसरातील वीजेचे खांब पडल्याने रात्र व दिवसभर वीज गायब झालेली होती. 

त्यामुळे शेतकऱ्यांना वीजेअभावी गैरसोयीला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे व वीजेचे खांब उमळून पडल्याने तारा शेतात लोंबत असल्याचे  चित्र सकाळी अनेक ठिकाणी पाहावयास मिळाले. जराडवाडी - बनवाडी येथील शेतकरी ज्ञानदेव बाबुराव जराड यांची मका व कांदा या पिकाचे नुकसान झाले. उंडवडी कडेपठार येथील शेतकरी 

सुमन नारायण जराड यांनी नऊ ते दहा लाख रुपये खर्चून नुकतेच उभारलेले शेडनेट वादळी वाऱ्याने भुईसपाट झाल्याने मोठे नुकसान झाले. या शेडमध्ये त्यांनी मेथीचे पिक घेतले होते. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करुन नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains damage farmers in Baramatis agricultural areas