

Pune Smart City Claims Under Fire as Rain Triggers Massive Traffic Chaos
esakal
पुणे: स्मार्ट सिटीचा आव आणणाऱ्या महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामांची संततधार पावसाने पुरती पोलखोल केली. शहरातील तुंबलेल्या सांडपाणी वाहिन्या आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला समोरे जावे लागले. महापालिका आणि वाहतूक प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शुक्रवारी ऐन गर्दीच्या वेळी मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.