esakal | मुसळधार पावसामुळे थांबली इंदापूर, बारामतीची वाहतूक  
sakal

बोलून बातमी शोधा

indapur rain

इंदापूर तालुक्यातील नागरिक रविवारी दिवसभर उकाड्यामध्ये हैराण झाले होते. सायंकाळी सातनंतर जोराच्या मुसळधार पावसाला सुरवात झाली. रात्रभर पाऊस सुरू होता. अचानक आलेल्या पावसाने

मुसळधार पावसामुळे थांबली इंदापूर, बारामतीची वाहतूक  

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागामध्ये रविवारी जोराचा पाऊस झाला. पावसामुळे शेतकऱ्यांच्या मका, ऊस, बाजरी, डाळिंब पिकांचे नुकसान झाले आहे. ओढेनाले वाहत असून, चिखलीच्या ओढ्याच्या पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने बीकेबीएन रस्त्यावरील वाहतूक बंद झाली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
इंदापूर तालुक्यातील नागरिक रविवारी दिवसभर उकाड्यामध्ये हैराण झाले होते. सायंकाळी सातनंतर जोराच्या मुसळधार पावसाला सुरवात झाली. रात्रभर पाऊस सुरू होता. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. पाऊस व जोराच्या वाऱ्यामुळे मका, कडवळ, उसाची पिके भुईसपाट झाली आहेत. ओढ्यामधून पाणी वाहत होते. सणसर, लासुर्णे, बेलवाडी परिसरामध्ये जोराचा पावसामुळे चिखलीच्या ओढ्याला पावसाच्या पाण्याचा पूर आला होता. पुलावरून पाणी वाहत असल्याने बारामती व बावड्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली होती. 

मतदारांनो, तुम्ही जे पेरलंय, तेच उगवलंय

पाटबंधारे विभागाचे सणसरचे शाखा अभियंता श्‍यामराव भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार सणसर परिसरामध्ये 133 मिलिमीटर, अंथुर्णे परिसरामध्ये 55 मिलिमीटर, निमगाव केतकी परिसरामध्ये 49 मिलिमीटर, बावडा परिसरामध्ये 43 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.