Pune Rain : खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार; मुठा नदीकाठच्यांना सतर्कतेचा इशारा!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत बुधवारी सायंकाळअखेर 28.69 टीएमसी (98.41 टक्‍के) उपयुक्‍त पाणीसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पात 27.96 टीएमसी (95.93 टक्‍के) पाणीसाठा होता.

पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी (ता.१४) सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. तर, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सायंकाळपर्यंत तुरळक पावसाची नोंद झाली. खडकवासला धरणात सायंकाळपर्यंत 80 टक्‍के पाणीसाठा होता. त्यामुळे मुठा नदीतून रात्री उशिरापर्यंत विसर्ग सुरू केलेला नव्हता. परंतु पावसाचा जोर पाहता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत बुधवारी सायंकाळअखेर 28.69 टीएमसी (98.41 टक्‍के) उपयुक्‍त पाणीसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पात 27.96 टीएमसी (95.93 टक्‍के) पाणीसाठा होता. पानशेत आणि वरसगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तर, टेमघर धरणही जवळपास पूर्ण भरले आहे. 

Breaking : कोरोना सर्व्हेचं काम स्थगित; मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निर्णय!​

पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही रात्री पाऊस सुरू होता. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्री पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून विसर्ग करावा लागेल. या पार्श्‍वभूमीवर नदीकाठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली. यंदाच्या पावसाळ्यात खडकवासला धरणातून आजअखेर 11.19 टीएमसी पाणी मुठा नदीमधून सोडण्यात आले आहे.

धरणांतील उपयुक्‍त पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्‍केवारी) : 
खडकवासला 1.56 (79.11) 
पानशेत 10.65 (100) 
वरसगाव 12.82 (100) 
टेमघर 3.66 (98.64)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Khadakwasla dam area