Breaking : कोरोना सर्व्हेचं काम स्थगित; मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निर्णय!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

गेल्या वर्षी २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई, पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले होते. अनेकांचा मृत्यूही झाला होता.

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात बुधवारी (ता.१४) दिवसभर पडत असलेल्या पावसामुळे आणि गुरुवारी (ता.१५) हवामान खात्याने वर्तविलेल्या मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी 'माझे कुटूंब, माझी जबाबदारी' मोहिमेचे गुरुवारी केले जाणारे सर्वेक्षण स्थगित केले आहे. 

जिल्ह्यातील सर्व खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयात थांबण्याचा आणि अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे.

शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस उतरणार रस्त्यावर; राज्यभरात उद्या ‘शेतकरी बचाव रॅली’!​

गेल्या वर्षी २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई, पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले होते. अनेकांचा मृत्यूही झाला होता. त्याच पद्धतीचे वातावरण येत्या १७ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. यामुळे राज्य सरकारने ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल विभागाने सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारपासून सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे.

पुणे जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेतील पहिल्या टप्प्यात कुटुंबांचे कोरोनाविषयक सर्वेक्षण करण्यात आले आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा १० ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Collector Deshmukh ordered that survey of Corona in the district postponed due to rain