
Pune rain problems waterlogging in Varje service road
esakal
वारजे : वारजे परिसरात दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले. पावसाचे पाणी योग्य प्रकारे वाहून नेण्यासाठी सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या पावसाळी वाहिन्या गायब झाल्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे रस्ते जलमय झाले असून, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.