पुराने रस्ता गेला वाहून, राहिले फक्त पाईप

महेंद्र शिंदे
Monday, 21 September 2020

कोंढणपूर (ता. हवेली) रस्त्यावरील आर्वी- सागराची ताल येथील मुख्य रस्ता आज दुपारी झालेल्या जोरदार पावसाने वाहून गेला. त्यामुळे सुमारे दहा गावांचा संपर्क तुटला होता. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने नवीन पुलावरून तात्पुरती वाहतूक सुरू केली आहे. वर्षभरापूर्वी याच ठिकाणचा रस्ता वाहून गेला होता. 

खेड शिवापूर (पुणे) : कोंढणपूर (ता. हवेली) रस्त्यावरील आर्वी- सागराची ताल येथील मुख्य रस्ता आज दुपारी झालेल्या जोरदार पावसाने वाहून गेला. त्यामुळे सुमारे दहा गावांचा संपर्क तुटला होता. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने नवीन पुलावरून तात्पुरती वाहतूक सुरू केली आहे. वर्षभरापूर्वी याच ठिकाणचा रस्ता वाहून गेला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोंढणपूर परिसरात सोमवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. सागराची ताल येथे असलेल्या पुलावर परिसरातील शेतातून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहत येते. येथे सोमवारी दुपारी पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की रस्ता पावसाच्या पाण्याने वाहून गेला. त्यामुळे सिंहगड परिसरातील सुमारे दहा गावांचा संपर्क तुटला होता. स्थानिक नागरिक, पोलिस यांनी तातडीने जेसीबीच्या साहाय्याने येथील नवीन पुलावरून तात्पुरता रस्ता करून वाहतूक सुरू केली. सुमारे तीन तास या रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली होती. 

आरोग्य सुविधांचे ‘ऑपरेशन’ गरजेचे! 

दरम्यान, गेल्या वर्षी येथील वाहून गेलेल्या रस्त्याचे निकृष्टपणे केलेले काम, नवीन पुलाचे संथ गतीने सुरू असलेले काम, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नसलेली नळ्यांची पुरेशी संख्या या कारणांमुळे हा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना या ठिकाणी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या पावसाने परिसरातील शेतकऱ्यांच्या भात शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains washed away the road