

Unsafe Bridge on Paud-Kolwan Road Sparks Alarm; Residents Seek New Bridge Urgently
esakal
- पांडुरंग साठे
कोळवण: पौड - कोळवण रस्त्यावर त होतले गावास जोडणाऱ्या वळकी नदीवरील सुमारे पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जुन्या, अरुंद आणि अत्यंत धोकादायक पुलाची अवस्था दिवसेंदिवस गंभीर झाली असून पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे पूलावरील स्लॅब वाहून गेला असून पूलावर मोठे खड्डे पडले आहेत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाने पुलाच्या लोखंडी सुरक्षा कठड्याला जोरदार धडक दिल्याने कठड्याचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर काल झालेल्या मुसळधार पावसात तुटलेले कठडे नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने पुलावरील सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.