Palkhi Sohala : पालखी सोहळ्याच्या कालावधीत पुणे शहरात जड वाहनांना बंदी

पुणे शहर वाहतूक शाखेकडून पालखी सोहळ्याच्या कालावधीत बुधवार (ता. ८) ते रविवार (ता. ११) या कालावधीत शहरात जड व अवजड वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
heavy vehicles ban in pune city

heavy vehicles ban in pune city

Sakal
Updated on

पुणे - शहर वाहतूक शाखेकडून पालखी सोहळ्याच्या कालावधीत बुधवार (ता. ८) ते रविवार (ता. ११) या कालावधीत शहरात जड व अवजड वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

वाहतूक नियोजनासाठी एक अतिरिक्त आयुक्त, एक पोलिस उपायुक्त, पाच सहाय्यक आयुक्त, १४ पोलिस निरीक्षक, ५७ सहाय्यक निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक आणि एक हजार १२० पोलिस अंमलदारांची नियुक्ती केली आहे. तसेच, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवडमधील पोलिस अधिकाऱ्यांशी समन्वय साधून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com