
पुणे : आत्तापर्यंत शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रात (रेड झोन) येणाऱ्या झोपडपट्ट्या किंवा दाट लोकवस्तीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र होते. मात्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या फॅसिलीटी फॉर ऍक्सेलरेटेड कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या (फॅक्ट) पथकाकडून घेतल्या जाणाऱ्या कोरोनाबाधीतांच्या शोधामध्ये प्रतिबंधीत क्षेत्र नसलेल्या (ग्रीन झोन) भागातील उच्चभ्रु सोसायट्यांमध्येही कोरोनाने शिरकाव केल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच "फॅक्ट'द्वारे कोरोनाबाधीत लोकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेत सामुहिक संक्रमणाची ठिकाणांवर कोरोनाला अटकाव घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाला मदतीचा हात देण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. विशेषतः पोलिसांनी शोधलेल्या सात हजार व्यक्तींपैकी 282 पेक्षा जास्त जण "पॉझिटिव्ह' असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शहरातील कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाला अक्षरशः रात्रंदिवस झटत आहे. अशा कठिण प्रसंगात या विभागाला मदतीचा हात देण्याचे काम पुणे पोलिसांनी केले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्यावतीने फॅसिलीटी फॉर ऍक्सेलरेटेड कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (फॅक्ट) या पथकाची एप्रिल महिन्यात निर्मिती करण्यात आली. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.शिवाजी पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गवळी यांच्यासमवेत मोबाईलसह अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती असणारे व नागरीकांशी उत्तम संवाद साधून शकणाऱ्या 14 पोलिसांची "फॅक्ट'साठी निवड करण्यात आली. कोरोनाबाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा (हायरिस्क कॉन्टॅक्ट) तांत्रिक विश्लेषण व त्यांची जुनी माहिती (हिस्ट्री) काढून ते कोणाकोणाच्या संपर्कात आले, ते कोणाला भेटले, कोणत्या ठिकाणी फिरले,अशी इत्यंभुत माहिती गोळा करून संबंधीत व्यक्तींची तपासणी करुन त्यांचे विलगीकरण करण्यात यावे, असे पोलिसांकडून आरोग्य विभागाला कळविले जाते. त्यानंतर महापालिकेचा आरोग्य विभाग संबंधीत व्यक्तींना तत्काळ रुग्णालयात आणून त्यांच्यावर उपचार सुरु करतात.
पुण्यात गुंडाराज ; वर्चस्ववादातून लाॅकडाउनमधील तिसरा खून
"फॅक्ट'ने शोधले सात हजार "हायरिस्क कॉन्टॅक्ट', 282 हून अधिक जण निघाले "पॉझिटिव्ह'
फॅक्टच्या टिमने आत्तापर्यंत कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेले 6974 इतक्या "हायरिस्क कॉन्टॅक्ट'चा शोध घेतला.त्यांच्यापैकी 22 हुन अधिक जण कोरोनाबाधीत झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरु केल्याने त्यांचा जीव वाचण्यास मदत झालीच, त्याचबरोबर हायरीस्क कॉन्टॅक्ट तत्काळ शोधल्याने त्यांचा इतरांशी होणारा संपर्कही थांबविण्यात पोलिस व आरोग्य विभागाला यश आले.
पुणेकरांनो,पुढचे २ दिवस घरातच राहा कारण...
सामुहिक संक्रमण ठिकाणांमध्ये वाढ
मार्केट यार्ड येथील भिमाले कॉम्पलेक्स एसआरए, भवानी पेठेतील मंजुळाबाई चाळ एसआरए, कोरेगाव पार्कमधील कवडे पार्क, पाटील इस्टेट, ताडीवाला रोड अशा ठिकाणी सामुहिक संक्रमण झाल्याने रुग्णांची संख्या वाढली. पोलिसांनी तेथील कोरोनाबाधीत व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क कॉन्टॅक्टचा तत्काळ शोध घेण्यास प्राधान्य दिले. परिणामी कोरोनाला अटकाव घालता येणे शक्य होऊ लागले आहे.
आम्हाला धान्य कधी मिळणार? लॉकडाऊन संपल्यावर... : संतप्त नागरिकांचा सवाल
या भागातील उच्चभ्रु सोसायट्यांपर्यंत पोचला कोरोना
बोट क्लब रोड, कोथरुड,वडगाव शेरी, सहकारनगर, मार्केट यार्ड, एअरपोर्ट रोड, मुंढवा, मार्केट यार्ड या भागतील अनेक उच्चभ्रु सोसायट्यांमध्ये मागील चार ते पाच दिवसांमध्ये कोरोना पोचला आहे. यापैकी बहुतांश भाग पुर्वी ग्रीन झोनमध्ये होता, मात्र हळूहळू या सोसायट्यांमधील नागरीकांनाही कोरोनाची लागण होऊ लागल आहे. कोरोनाचा संसर्ग नसलेल्या या भागात (नॉन कंटेनमेंट झोन) आता 100 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले अहेत.
मुंबईकरांमुळं पुणेकर धोक्यात; कोरोनाचा मुंबई-पुणे-मुंबई प्रवास
"फॅक्ट'पथकाच्या निदर्शनास आलेली सामुहिक संक्रमणाची कारणे
- वस्त्या, वाडे, सोसायट्या अशा दाट लोकवस्तीमध्ये होते सामुहिक संक्रमण
- वस्त्या, एसआरए बिल्डींगमध्ये दाटीवाटीने राहणारी कुटुंबे
- कॅरम, जुगार यांसारखे खेळ खेळण्यासाठी एकत्र जमणे
- करमणुकीसाठी एकत्र येणे
- आजारची लक्षणे असली तरीही त्याकडे दुर्लक्ष करणे
- विद्यापीठ चौकातील दोन पुलांचा निर्णय झाला!
अशा उपाययोजना करता येतील:
- सोसायट्यात येणाऱ्या प्रत्येकाचे स्क्रीनींग व्हावे
- सुरक्षारक्षकांकडे मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था ठेवावी
- घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे
- अत्यावश्यक सेवा वगळता सोसायटीबाहेरील व्यक्तींना देऊ नये
- सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांचा वापर टाळणे
"कोरोनबाधीत लोकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध पोलिसांचे "फॅक्ट'पथक घेते. त्यांची माहिती आरोग्य विभागाला देऊन संबंधीत व्यक्तींना तत्काळ रुग्णालयात नेऊन त्यांची तपासणी केली जाते. त्यातुन नवीन रुग्ण निष्पन्न होतात. तसेच सामुहिक संक्रमण रोखण्यासही मदत होत आहे. आरोग्य विभागाला काही प्रमाणात मदत मिळावी, या उद्देशाने पुणे पोलिस मदत करीत आहेत.''
- अशोक मोराळे, अतिरीक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.