पुण्यात अडकलेल्या कामगारांना `त्यांनी` दिला मदतीचा हात...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

गरजू कामगारांना आपल्या स्वगृही परतण्यासाठी पुणे ते पश्चिम बंगाल अशी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली.

विश्रांतवाडी (पुणे) : धानोरी येथील भिमलहुजी महासंग्राम सामाजिक विकास संघटना व दान प्रतिष्ठानच्या वतीने लॉकडाउनमुळे पुण्यात अडकलेल्या पूर्व पुणे भागातील गरजू कामगारांना आपल्या स्वगृही परतण्यासाठी पुणे ते पश्चिम बंगाल अशी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच या प्रवास काळात अन्नपुरवठा होण्यासाठी आवश्यक अन्नधान्य व पाण्याची सोय  करण्यात आली.

इंद्रायणी घाटावर गुंडांची दहशत; रात्रीच्या काळोखात लुटतायेत नागरिकांना

यामध्ये खराडी, चंदननगर, येरवडा, विश्रांतवाडी, दिघी परिसरातील हाॅटेल कामगार, बांधकाम मजूर आदींचा समावेश होता. ही व्यवस्था करणारे मुख्य संयोजक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद वैरागर यांच्या हस्ते सर्व कामगारांना साहित्य वाटप करण्यात आले.

पुणेकरांनो, मार्केट यार्डातील भुसार बाजाराबाबत महत्वाची बातमी: वाचा सविस्तर

कार्यक्रमाचे आयोजन दान प्रतिष्ठान अध्यक्ष दशरथ माटवनकर, संपर्क प्रमुख प्रताप मोहिते, युवा अध्यक्ष रवी खैरनार, शहर पदाधिकारी गणेश मोरे, सतीश वैरागर, राजू वैरागर, रवी वैरागर, संदेश नेटके, गणेश मोरे, सतीश वैरागर, राजू वैरागर,  रवी वैरागर, काळुशेठ लश्करे, संदेश नेटके यांनी केले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

याबाबत पश्चिम बंगालला निघालेले हॉटेल कामगारसंजय भूमाली म्हणाले की, आम्ही सर्व कामगार दिघी, धानोरी, चंदननगर, खराडी, येरवडा इतर विविध भागात आम्ही हॉटेल कामगार म्हणून काम करत होतो. परंतु, या लॉकडाउनच्या काळामध्ये सर्व हॉटेल्स वगैरे बंद झाल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली होती अशा परिस्थितीमध्ये आम्हाला रूमभाडे, तसेच आमचा परिवार सांभाळणे अवघड झाले होते अशा अडचणीच्या काळामध्ये आम्हाला विनोद वैरागर व त्यांच्या संघटनेचे सर्व कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला जेवणाची व धान्याची मदत केली तसेच लॉकडाउन उठल्यानंतर आम्हाला आमच्या मूळ गावी जाण्यासाठी त्यांनी आम्हाला खूप मोठे सहकार्य केले त्यांचे उपकार आम्ही आयुष्यभर कधीही विसरू शकणार नाही आम्हाला गावात गावी जाण्यासाठी त्यांनी आम्हाला एक देवदूताप्रमाणे भेटून लक्झरी गाडीची व्यवस्था करून दिली व आम्हाला आमच्या प्रवासामध्ये पुरेल एवढे पाण्याची व्यवस्था  रेशन किट व इतर सामान भरून दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: help to workers in pune