दोस्तांची दुनियादारी, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी...

satish fulsundar
satish fulsundar
Updated on

पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील सतीश चंद्रकांत फुलसुंदर (वय 35) 
या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. मात्र, तो त्याच्या कुटुंबातील कर्ता पुरुष होता. त्यामुळे त्याच्या वर्गमित्रांनी त्याच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी एक लाख रुपयांची मदत गोळा करून दिली. त्यातून त्यांनी समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील सतीश फुलसुंदर या तरुणाने फॅब्रीकेशनचा व्यवसाय सुरु केला होता. व्यवसायाची व्याप्ती वाढवत असताना चाकण परिसरातील औद्योगीक क्षेत्रातील कंपन्यांची मोठमोठी शेड बनविण्याची कामे त्याला मिळू लागली. मात्र, 8 जून रोजी चाकण येथे 50 फूट उंच शेडवर वेल्डिंगचे काम करत असताना पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सतीश हा त्याच्या घरातील एकटा कमावता होता. कर्ता पुरुषच अकाली गेल्यामुळे त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले. त्याच्या मागे त्याची वृद्ध आई, पत्नी व 2 लहान मुले, असा परिवार आहे. ही घटना समजताच अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर या शाळेतील सन 2001 मधील दहावीच्या वर्गातील मित्र मैत्रिणींचा व्हाॅट्सअॅप ग्रुपवर सतिश याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी युवक कार्यकर्ता प्रशांत हिंगे पाटील याने चर्चा घडवून आणली.

त्यानंतर आठवडाभरात या व्हाॅट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एक लाख रुपयांची आर्थिक मदत जमा झाली. जमा झालेली रक्कम पोस्टात दीर्घ मुदतीच्या ठेवीमध्ये ठेवण्याचा निर्णय सर्वांनी घेतला. सोशल मीडियाचा असाही विधायक वापर होऊ शकतो, ही बाब या निमित्ताने अधोरेखित झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com