maharashtra flood
sakal
पुणे - पूरग्रस्तांसाठी अनेक मदतीचे हात सरसावले असून, ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे मदतीचा ओघ दुसऱ्या दिवशीही सुरू होता. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा ‘सकाळ रिलीफ फंडा’ने कायम ठेवत राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीकरिता समाजाला मदतीचे आवाहन केले आहे. ‘सकाळ रिलीफ फंडा’ने केलेल्या मदतीच्या आवाहनाला समाजातील दानशूरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.