तुमच्या मनोबलाला हेल्पलाइनचा बूस्टर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 एप्रिल 2020

माहिती राहणार गोपनीय
मराठी आणि हिंदी भाषेतून ही सेवा पुरवली जाईल. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील केवळ एक फोन करून ही सुविधा मोफत मिळू शकते. तसेच आपली माहिती पूर्णपणे गोपनीय राहील.

यासाठी संपर्क क्रमांक -
रेश्‍मा कचरे : ९५६१९११३२०
योगिनी मगर : ९६६५८५०७६९

पुणे - कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व समाज धास्तावलेला आहे. जगभरातून येणाऱ्या बातम्या आपल्यावर आदळत आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडेही विषाणूचा संसर्ग पसरण्याची शक्‍यता आहे. याचे आपल्यावर शारीरिक परिणाम होत आहेच; पण मानसिक तणावातूनही आपण जात आहोत. त्यासाठी मोफत आधार देणारी मनोबल हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. समाजातील काहीजण कुटुंबापासून लांब आहेत. अशा वेळी प्रत्यक्ष भेटता न येणे हेसुद्धा ताणाचे असू शकते. कोरोनाबद्दल खूप उलटी सुलटी माहिती समाज माध्यमाच्या मधून पसरते आहे.

त्यामुळे नेमकी माहिती आणि नागरिकांना भावनिक प्रथमोपचार मिळावे यासाठी परिवर्तन संस्था, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि काही समविचारी संस्थांच्या कार्यकत्यांनी एकत्र येऊन मनोबल हेल्पलाइन नावाचा उपक्रम सुरू केला आहे, असे डॉ. दाभोलकर यांनी सांगितले.

मनोबलच्या उपक्रमासाठी वीसपेक्षा अधिक तज्ज्ञ समुपदेशक आणि प्रशिक्षित मानस मित्र आणि मैत्रिणी यांच्या माध्यमातून मनोबल हेल्पलाइन चालवली जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helpline booster for your morale