
पुणे - कोथरूड येथे आठवड्याभरापेक्षा जास्त कालावधीपासून डुकरे मरत असल्याने राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या तीन अधिकाऱ्यांच्या पथकाने आज प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी मृत डुक्कर सापडेल असता त्याच्या शवविच्छेदनातून काविळ सदृश आजाराने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याचे काही अवयव भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. महापालिकेने आज एका दिवसात ७६ डुकरांना पकडून निरीक्षणात ठेवले असून, दोन दिवसांनी त्यांना कत्तलखान्यात पाठवले जाणार आहे.
कोथरूडमध्ये वारंवार मृत डुकरे सापडत असल्याने या भागात खळखळ उडाली आहे. याचे नेमके कारण काय हे महापालिकेला स्पष्टपणे सांगता येत नव्हते. तसेच महापालिकेचा आरोग्य विभाग व कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने डुकरांच्या मृत्यूची वेळीच माहिती मिळत नसल्याने पुढील कार्यवाहीला उशीर होत होता. .
याप्रकरणाची दखल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने घेतली. सहाय्यक आयुक्त बाळासाहेब गायकवाड आणि अन्य दोन अधिकाऱ्यांनी भारतीनगर परिसरात पाहणी केली. या अधिकाऱ्यांना कोथरूड कचरा डेपो येथे एक मृत डुक्कर सापडल्यानंतर त्याचे त्वरित शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये कावीळ सदृश आजारामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याचे नेमके कारण शोधण्यासाठी त्याचे काही अवयव प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असल्याचे गायकवाड यांनी ‘सकाळ’ बोलताना सांगितले.
मृत डुकरांचा नेमका आकडा किती
यासंदर्भात दुष्यंत मोहोळ म्हणाले, गेल्या १०-१२ दिवसांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे, पण आरोग्य विभाग व क्षेत्रीय कार्यालयात अजिबात समन्वय नाही. त्यामुळे डुकरांचा मृत्यूचा निश्चित आकडा नाही, वेळेवर माहिती नाही तसेच नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ नये यासाठी काही केले जात नव्हते. यासंदर्भात आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे म्हणाल्या, महापालिकेच्या यंत्रणेने मृत डुकरे उचलली त्यांची संख्या ४१ असून ही अधिकृत संख्या आहे.
महापालिकेतर्फे कोथरूड भागात औषध फवारणी केली जात असून, तसेच या भागात भरारी पथ नियुक्त केले असून, या घटना रोखण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. आज ७६ डुकरे पकडून त्यांना निरीक्षणात ठेवले आहे, दोन दिवसांनी त्यांना कत्तलखान्यात पाठवले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.