पुण्यात रानगव्यांपाठोपाठ हरणांचा कळप शिरला सोसायटीत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 December 2020

आता पुण्यात रानगव्यांपाठोपाठ आता हरणांचा कळप दाखल झाला आहे. एनडीए जवळील जंगलातून आशिर्वाद सोसायटीत हरणाचा कळप शिरला आहे. सोसायटीच्या पार्किंगमध्ये हा कळप फिरताना दिसत आहे. लोक त्यांच्या अगदी जवळ येत आहेत त्यांना काहीतरी खायला देत आहेत. तिथल्या रहिवाशांनी रहिवाशांनी व्हिडिओ काढलेले व्हिड सध्या व्हायरल होत आहे. वनविभागाला याबाबत माहिती कळविली आहे. 

पुणे : पुण्यात  एकाच महिन्यात गवा दिसण्याच्या घटना दोनदा घडल्या आहेत. परिसरातील आशिर्वाद सोसायटीत हरणाचा कळप शिरला आहे.काही दिवासांपुर्वीच पुण्यात एक रानगवा शिरला होता आणि मृत्यूमुखी  पडला होता. त्यांनतर  एका आठवड्याने पुन्हा दुसरा रानगवा शिरला त्याला मात्र वनविभागाने सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडले.  त्यांनतर एक सांबार देखील  पुण्यात शिरले होते त्याला ही वनविभागाने पुन्हा सुखरुपपणे नैसर्गिक अधिवासात सोडले. 

आता पुण्यात रानगव्यांपाठोपाठ आता हरणांचा कळप दाखल झाला आहे. एनडीए जवळील जंगलातून आशिर्वाद सोसायटीत हरणाचा कळप शिरला आहे. सोसायटीच्या पार्किंगमध्ये हा कळप फिरताना दिसत आहे. लोक त्यांच्या अगदी जवळ येत आहेत त्यांना काहीतरी खायला देत आहेत. तिथल्या रहिवाशांनी रहिवाशांनी व्हिडिओ काढलेले व्हिड सध्या व्हायरल होत आहे. वनविभागाला याबाबत माहिती कळविली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एनडीए जवळच्या जंगाल असे बरेच प्राणी पहायला मिळतात. परंतू परिसरातील सोसायची वावरताना दिसत आहे. हरणांचा कळप पार्किंमध्ये बागडत आहे. लोक स्वागत करत असले पण भटक्या कुत्र्यांची भिती वर्तवती जात आहे. हरणांच्या मागे पळत आहे त्यांना पकडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सहाजिकच त्यामुळे  हरणांना हानी पोहचू शकते.

शिवणे येथील आशिर्वाद सोसायटीची एक कंपाउंड भिंत पडलेली आहे. त्यामुळे हे हरीण थेट शिरत आहे. वन विभागाला याबाबत कळवले असून हा मार्ग बंद करणार असून  हरणांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडणार आहेत. सोसायटीत शिरलेल्या हरणांचे स्वागत केले जात आहे. लहान मुले, मोठ्यांची येथे गर्दी होत आहे. हरणांना खायला देत आहेत असे चित्र सध्या पुण्यात दिसत आहे. 
 
कोरेगाव भीमा येथे नागरिकांची होणार आरोग्य तपासणी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A herd of deer has arrived in Pune after indian Bison