निराशाजनक : कोरोनावर हर्ड इम्युनिटीचा प्रयोग देशात अशक्‍यच; कारणेही तशीच!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मे 2020

कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या अमेरिका आणि युरोपात अजूनही सामूहिक रोगप्रतिकारशक्ती विकसित झाली नसल्याचे शोधनिबंध सांगत आहे. इटलीने सुरवातीला देशातील नागरिकांची सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जास्त उपाययोजना न केल्याचेही वैज्ञानिक वर्तुळात बोलले जात आहे. त्याचे परिणामही इटलीने भोगले आहे. आपल्या देशाची लोकसंख्या बघता

पुणे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधांबरोबरच "हर्ड इम्युनिटी' (सामूहिक रोगप्रतिकारशक्ती) हा ही एक पर्याय आहे. परंतु यासाठी समूहातील 70-80 टक्के लोकसंख्येला विषाणूची बाधा व्हायला हवी. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशासाठी हे करणे धोक्‍याचे असल्यामुळे सामूहिक रोगप्रतिकार सध्या अशक्‍य आहे, असे मत शास्त्रज्ञ व्यक्त करत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी नुकतेच आयोजित एका वेबिनारमध्ये याला पुष्टी दिली आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या अमेरिका आणि युरोपात अजूनही सामूहिक रोगप्रतिकारशक्ती विकसित झाली नसल्याचे शोधनिबंध सांगत आहे. इटलीने सुरवातीला देशातील नागरिकांची सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जास्त उपाययोजना न केल्याचेही वैज्ञानिक वर्तुळात बोलले जात आहे. त्याचे परिणामही इटलीने भोगले आहे. आपल्या देशाची लोकसंख्या बघता अशा प्रकारे सामूहिक रोगप्रतिकारशक्ती विकसित करण्याचा विचारच भयंकर आहे.

लॉकडाउन'चा मुक्काम अखेर वाढला पुण्यात काय चालू काय बदं?

सामूहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी)
व्यक्तीला विषाणूची लागण झाल्यावर त्याविषाणू विरुद्ध त्याची स्वतःची प्रतिकारशक्तीत विकसित होते. विषाणूच्या प्रादुर्भावापासून वाचल्यावर त्याला पुन्हा तो रोग होण्याची शक्‍यता फार कमी असते. आपल्याकडे कांजिण्या किंवा गोवर झाल्यावर पुन्हा त्या व्यक्तीला पुन्हा तोच रोग होत नाही. असेच समूहातील जवळपास 80 टक्के लोकसंख्येला कोविड-19 विषाणूची लागण झाल्यावर संपूर्ण समूहाचीच रोगप्रतिकारशक्ती विकसित होईल. पर्यायाने कोणत्याही बाह्य लसीची किंवा औषधाची गरज भासणार नाही.

कोरोनाच्या बाबतीतली जोखीम
- जगभरात कोरोनाच्या प्रसाराचा वेग सर्वाधिक आहे.
- त्यामुळे योग्य त्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा पुरविणे शक्‍य होत नाही
- पर्यायाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढते
- देशात एकाच वेळी कोट्यवधी लोकांवर उपचार करणे शक्‍य नाही
- भारतातील 70 टक्के लोकसंख्या धरली तरी तब्बल 90 कोटी लोकांवर उपचार करावे लागतील!

-चांगली बातमी! पुण्यात आरटीओ कार्यालयांचे कामकाज सोमवारपासून सुरू होणार

जर्नल ऑफ इन्फेक्‍शनच्या संशोधनानूसार
देश :कोरोना प्रसाराचा दर: सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित होण्यासाठी आवश्‍यक लोकसंख्या
- अमेरिका (युएसए)     3.29                         69.6 टक्के
- फ्रांस                        3.09                         67.6 टक्के      
- इस्त्राईल                   3.02                         66.9 टक्के
- इंग्लंड                        2.9                          65.5 टक्के
- इटली                       2.44                            59 टक्के

-सोनं खातंय भाव अहो ही तर, गुंतवणुकीची 'सुवर्ण'संधी !

देशातील वैद्यकीय सज्जता:
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पाप्युलेशन सायन्सचा(आयआयपीएस) नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये कोरोनाबाधितांची भविष्यातील संख्या आणि उपलब्ध वैद्यकीय साधनांचा आढावा घेतला आहे. त्यावरून कोरोनाबाधितांच्या उपचारासाठीची सध्याची स्थिती लक्षात येईल. पण जर सामूहिक प्रतिराशक्ती विकसित करायची असल्यास देशाला किती तयारी करावी लागेल याचा अंदाजही आपल्याला येईल.
1) सर्वाधिक प्रसाराचा वेग (आर नॉट: 1.86) गृहीत धरल्यास मे महिन्याच्या अखेर कोरोनाबाधितांची देशातील संख्या 
- लॉकडाउन असताना: 30 लाख (अंदाजे)
- लॉकडाउन नसताना: 1.71 कोटी (अंदाजे)
2) देशात उपलब्ध कोरोना बाधितांसाठी अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या: 1.35 लाख

 

) सध्या भरल्या गेलेल्या खाटांची संख्या: 1.5 टक्के
4) विलगीकरणासाठी उपलब्ध खाटा: 6.5 लाख
5) आयसीयुची गरज भासणारे कोरोना रुग्णांची संख्या: 5 टक्‍क्‍यांपेक्षा कमी
6) व्हेंटिलेटरच गरज भासणारी कोरोना रुग्णांची संख्या: 1.1 टक्के
7) ऑक्‍सिजन सपोर्टची गरज भासणारी कोरोना रुग्णांची संख्या: 3.3 टक्के

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे►क्लिक करा

"एखाद्या समूहाची प्रतिकारशक्ती विकसित होण्यासाठी लागणारा कालावधी लागतो. भारतात सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी आपल्याला माणसांच्या मृत्यूची मोठी किंमत मोजावी लागेल. त्यामुळे सध्यातरी असा विचार करणे शक्‍य नाही.''
- डॉ. शेखर मांडे, महासंचालक, सीएसआयआर.

''कोरोना विरुद्ध देशातील सामुहिक प्रतिकारशक्ती विकसित होण्यासाठी निदान दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागेल. कोरोनाची लस येण्यापुर्वी सामुहिक प्रतिकारशक्ती विकसीत होईल असा विचारही आपण करु शकत नाही.''
- अदार पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिरम इंन्स्टिट्यूट.

 

कोरोना, उकाडा अन् पावसाने पुणेकर हैराण शहरात दमदार पावसाची हजेरी!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Herd immunity experiment on corona is impossible in the india