पुणे - यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पुणे पोलिसांनी पारंपरिक सुरक्षा व्यवस्थेबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सराईत गुन्हेगारांना चांगलाच चाप लावला. पोलिसांनी सीसीटीएनएस डेटाबेस आणि एआय-आधारित चेहरा ओळख प्रणालीद्वारे सराईत गुन्हेगारांची ओळख पटवत काहीजणांना ताब्यात घेतले. या आधुनिक प्रयोगामुळे गुन्हेगारांना यापुढील काळात गर्दीच्या ठिकाणी किंवा मिरवणुकीत सहज वावर करणे कठीण होणार आहे.