अमेरिकेच्या मुंबई दुतावासातील उच्चायुक्तांची पुणे विद्यापीठाला भेट  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमेरिकेच्या मुंबई दुतावासातील उच्चायुक्तांची पुणे विद्यापीठाला भेट 

उच्च शिक्षण देणाऱ्या अमेरिकेतील संस्था भारतीय विद्यापीठांशी जोडण्यासाठी उत्सुक : डेविड जे. रान्झ

अमेरिकेच्या मुंबई दुतावासातील उच्चायुक्तांची पुणे विद्यापीठाला भेट 

पुणे : आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना भारतीय विद्यापीठांशी जोडले जाण्यासाठी व्यापक संधी उपलब्ध होतील, असे नवीन शैक्षणिक धोरणात नमूद केले आहे. उच्च शिक्षण देणाऱ्या अमेरिकेतील संस्था भारतीय विद्यापीठांशी जोडले जाण्याबाबत अधिक उत्सुक असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या मुंबई दुतावासातील उच्चायुक्त डेविड जे. रान्झ यांनी नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी नवीन शैक्षणिक धोरणामधील उल्लेखनीय बाबींची माहिती डेविड जे. रान्झ यांना दिली. यावेळी झालेल्या चर्चेत प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, इंटरनॅशनल लिकेजेसच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर,  भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश गोसावी, तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्सचे प्रमुख डॉ. अविनाश कुंभार आदी मान्यवर सहभागी झाले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरु होणारे 'सेंटर फॉर मॉलिक्युलर डायग्नॉस्टीक' हे संशोधन केंद्र आणि  विद्यापीठातर्फे संसर्गजन्य रोगांवर केले जाणारे संशोधन याबाबत जाणून घेतल्यानंतर अमेरिकेच्या दूतावासातील रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र व पुणे विद्यापीठ एकत्रितरित्या या विषयावर काम करू शकतात, असे डेविड जे. रान्झ यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या दर्जेदार विद्यापीठाशी जोडले जाण्याबाबत अनेक अमेरिकन संस्था, विद्यापीठे उत्सुक आहेत, त्यामुळे अशा संस्थांसोबत पुणे विद्यापीठाने योग्य समन्वय साधावा. पश्चिम भारतातील विद्यापीठांना शैक्षणिक अभ्यासक्रम विकास, नवीन तंत्रज्ञान याबाबत सहाय्य करण्यासाठी अमेरिका खूप उत्सुक आहे, असेही त्यांनी भेटीदरम्यान नमूद केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अमेरिकेतील विद्यापीठांसोबतचे संबंध आणखीन दृढ व्हावेत या दृष्टीकोनातून प्रयत्नशील आहोत. येत्या काळात अमेरिकेतील विद्यापीठासोबत ब्लेंडेड अभ्यासक्रम, लिबरल आर्टस् आणि संयुक्त संशोधन उपक्रम याबाबत जोडले जाण्याचा मानस आहे.
-डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

(संपादन : सागर डी. शेलार)

Web Title: High Commissioner Us Embassy Mumbai Visits Pune University

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top