BREAKING : कंगना रानौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; वांद्रे न्यायालयाने दिले होते आदेश

तुषार सोनवणे
Saturday, 17 October 2020

कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणयात आला आहे.

मुंबई-  कंगनाच्या विरोधात मुंबईतील वांद्रे न्यायालयाने एका प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. वांद्रे न्यायालयाने हे आदेश दोन व्यक्तींनी दाखल केलेल्या याचिकेवर दिले होते. त्यानुसार कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणयात आला आहे.

कंगनाविरोधात याचिका दाखल करणा-यांनी म्हटलंय की 'ती बॉलीवूडमध्ये हिंदू-मुस्लिम समुदायमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मिडियाच्या माध्यमापासून ते टीव्हीवर सगळीकडे बॉलीवूडच्या विरोधात बोलत आहे. ती सतत बॉलीवूड विरोधात विष ओकतेय.'

कंगनाविरोधात विरोधात दोघांनी वांद्रे न्यायालयात याचिका दाखल केली होती ज्यामध्ये म्हटलं होतं की 'कंगना रनौत तिच्या ट्विट्सच्या माध्यमातून दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करण्याला प्रोत्साहन देत आहे. यामुळे केवळ धार्मिक भावनांना ठेच पोहोचत नाहीये तर इंडस्ट्रीतील कित्येक लोक दुखावले गेले आहेत. त्यामुळे कंगनावर जातीयवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप लावला गेला होता. 

या प्रकरणी वांद्रे पोलिस स्टेशनने कंगनाच्या विरुद्ध हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी प्रकरणाचा तपास व्हावा यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. कोर्टाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. याचिकाकर्त्यांनी न्यायालयात कंगनाचे ट्विट्स सादर केले.

त्यानुसार कंगना रानौत आणि तिची बहिण रंगोली चंडेल विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता 124 नुसार देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana Ranaut charged with treason The order was issued by the Bandra court

टॉपिकस