mumbai high court
sakal
पुणे - पुणे महापालिकेत कार्यकारी अभियंता हुद्द्यावरील अधिकाऱ्यांना अधिक्षक अभियंता पदावर पदोन्नती देताना चुकीच्या कार्यपद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे अन्य अभियंते पदोन्नतीपासून वंचित राहिल्याने उच्च न्यायालयाने महापालिकेला दणका दिला आहे. महापालिका प्रशासनाने केलेल्या सर्व पदोन्नती रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेत व्यवस्थित निर्णय न घेतल्याने हा वाद न्यायालयात गेल्याने महापालिकेवर मोठी नामुष्की ओढवली आहे.