
Political Scuffle in Pune Bapu Pathare vs. Bandu Khandve Over Pending Lohgaon Projects
Sakal
वडगाव शेरी : लोहगावमधील रखडलेल्या विकास कामासंदर्भात आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांमध्ये वादावादी झाली. त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत आणि झटापटीत झाले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्की करण्यात आली. दरम्यान, उशिरापर्यंत विमानतळ पोलिसांनी याबाबत कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता.