Punes Infrastructure Development
sakal
पुणे - समाविष्ट गावातील मिळकतकराचा प्रश्न, शुद्ध पाण्याचा पुरवठा, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मिसिंग लिंकच्या रस्त्यांसाठीचा निधी, ‘पीएमआरडीए’च्या हद्दीचा विकास आराखड्यासह अनेक महत्त्वाचे प्रश्न शासनाच्या स्तरावर रेंगाळले आहेत. सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हे प्रकल्प मार्गी लागतील का? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
तीन वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक राज आहे. लवकरच महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर यंदाचे अधिवेशन शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे पुणे शहराला अधिवेशनाबाबत मोठ्या अपेक्षा आहेत. या निमित्ताने शहर व परिसराच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागल्यास पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने शहराच्या कारभाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न.