भिगवणला ज्वारीला उच्चांकी दर

प्रशांत चवरे 
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

भिगवण : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण उपबाजार आवारांमध्ये ज्वारीला प्रति क्विंटल ४००० रुपये इतका तर बाजारीला २५११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला असल्याची माहीती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली आहे.

भिगवण : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण उपबाजार आवारांमध्ये ज्वारीला प्रति क्विंटल ४००० रुपये इतका तर बाजारीला २५११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला असल्याची माहीती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली आहे.

पुणे, सोलापुर व अहमदनगर या तीन जिल्ह्याच्या सिमारेषावर असलेल्या इंदापुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण येथील उपबाजार आवारांमध्ये तीन जिल्ह्यातील शेतकरी भुसार शेतीमाल विक्रीसाठी आणतात. खरेदीसाठीही मोठ्या प्रमाणात व्यापारी येत असल्यामुळे या ठिकाणी मोठी स्पर्धा असते त्याचाच फायदा शेतकऱ्यांना होतो. रविवारी(ता.२८) येथील उपबाजार आवारांमध्ये ज्वारी ४०००, बाजरी २५११,गहु २७००,मका १४०० ते १५००, हरभरा ३००० ते ३८५१, भुईमूग शेंगा,३८०० ते ४३०० असा भाव मिळाला. येथे ३६५३ पोती शेतीमालाची आवक झाली होती.

याबाबत बोलताना इंदापुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, भिगवण येथील उपबाजार आवारांमध्ये शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा पुरविल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची येथे मोठ्या प्रमाणात आवक होते. बाजार समितीच्या वतीने शेतमाल तारण कर्ज योजना सुरु केली असुन शेतीमाल हमीभाव केंद्र सुरु करणेबाबत शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. यावेळी उपसभापती यशवंत माने, संचालक अनिल बागल, संतोष वाबळे, आबा देवकाते, सुभाष दिवसे, व सचिव जीवन फडतरे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: high price to jawar in bhigwan