'नीरा भीमा'कडून इथेनॉलचे उच्चांकी उत्पादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nira bhima

'नीरा भीमा'कडून इथेनॉलचे उच्चांकी उत्पादन

बावडा : ‘‘शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने सन २०२०-२१ च्या हंगामात इथेनॉलचे १ कोटी ८ लाख लिटरचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. कारखान्याचा प्रतिदिनी १ लाख लिटर उत्पादन क्षमतेचा इथेनॉलचा नवीन प्रकल्प पुढील वर्षीच्या इथेनॉल हंगामापासून कार्यान्वित होईल. त्यामुळे कारखान्याची इथेनॉलची उत्पादन क्षमता प्रतिदिनी २ लाख लिटर एवढी होणार आहेत.

चालू होणाऱ्या हंगामामध्ये कारखान्याने १ कोटी ७५ लाख लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे.’’ अशी माहिती कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी दिली. नीरा भीमा कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या इथेनॉल हंगामाची सांगता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इथेनॉलचे पूजनाने झाली. त्यावेळी त्यांनी माहिती दिली. कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचा हंगाम १७ नोव्हेंबर रोजी सुरू झाला.

हेही वाचा: 'ती' एक दुर्दैवी घटना आणि गाव झाले कायमचे तंबाखूमुक्त!

त्यानंतर २०७ दिवसानंतर हंगाम चालला. या हंगामामध्ये दैनिक ५२ हजार लिटर क्षमतेने प्रकल्पाच्या १२० टक्के कार्यक्षमतेचा वापर करत १ कोटी ८ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन घेण्यात आले व तेल कंपन्यांना कराराप्रमाणे पुरवठा केला आहे. तसेच, हंगामात रेक्टिफाईड स्पिरिटचे १ कोटी १८ लाख लिटर उत्पादन घेऊन त्यापैकी ३.१८ लाख लिटर विक्री करण्यात येऊन उर्वरित रेक्टिफाईड स्पिरिटचा इथेनॉल उत्पादनासाठी वापरण्यात आला.’’

हेही वाचा: ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत अनोखं रक्षाबंधन

इथेनॉलचा हंगाम यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल इथेनॉल प्रकल्पाचे इन्चार्ज सुधीर गेंगे-पाटील, अधिकारी, कर्मचारी यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, कार्यकारी संचालक डी. एन. मरकड यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलास वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रेय शिर्के, दत्तू सवासे, प्रताप पाटील, दादासाहेब घोगरे, हरिदास घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, चंद्रकांत भोसले, संगीता पोळ, कमाल जमादार आदी उपस्थित होते. संचालक भागवत गोरे व सुनीता गोरे या उभयतांच्या हस्ते पूजा करण्यात आली. कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: High Production Of Ethanol From Nira Bhima Sugar Company

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News