
पुणे : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाची २३ लाख ६५ हजारांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. ही घटना डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान घडली. या प्रकरणी माळवाडी परिसरात राहणाऱ्या एकाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.