
Ranjangaon Accident
Sakal
शिरूर : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव एमआयडीसी परिसरात भरधाव मोटारीने एका प्रवासी रिक्षासह दोन दुचाकींना ठोकरले. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याच्या आलिशान मोटारीने महामार्गावर दहा ते पंधरा मिनिटे माजविलेल्या या थरारात सातजण जखमी झाले. रविवारी (ता. १२) रात्री उशिरा घडलेल्या या अपघाताबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली. मात्र, ही बाब वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोचल्यानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.