High Speed Railway : हायस्पीड रेल्वेचे, ग्रीन कॅरिडोअरचे भवितव्य सल्लागार कंपनीच्या हाती!

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात.
High Speed Railway
High Speed Railwaysakal
Updated on
Summary

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात.

पुणे - पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असताना राज्य सरकारने प्रस्तावित पुणे-नाशिक ग्रीन कॅरिडोअर प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या सल्लागार कंपनीकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर हायस्पीड रेल्वे आणि ग्रीन कॅरिडोअर रस्ता एकत्र होणार की स्वतंत्र होणार अथवा एक प्रकल्पावर गंडांत्तर येणार हे ठरणार आहे.

नेमके काय झाले?

या रेल्वे मार्गाच्या आखणीबाबत पुणे ते नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाचा तांत्रिक व वित्तीय सुसाध्यता अहवाल तयार करण्याबाबतचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसीला) दिले होते. त्यावरून सध्या वाद सुरू झाला होता. तीन महिन्यांपूर्वी महारेल्वेच्या अधिकाऱ्यांसमावेत झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गतीने देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर या वादावर पडदा पडला असल्याचे बोलले जात होते.

दरम्यानच्या कालवधीत पुणे- ग्रीन कॅरिडोअर रस्त्यासंदर्भात एमएसआरडीसीने सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू देखील करून ती अंतिम टप्प्यात आणली आहे. त्यामुळे एकाच वेळी रेल्वे आणि औद्योगिक मार्ग असे दोन पातळ्यांवर काम सुरू झाले आहे. सल्लागार कंपनीकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर रेल्वे मार्ग आणि ग्रीन कॅरिडोअर हे दोन्ही एकाच ठिकाणी होणार की स्वतंत्रपणे राबविले जाणार अथवा हायस्पीड रेल्वेला ब्रेक लागणार हे स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रकल्पाची का आहे आवश्यकता?

  • नाशिक ही कृषी मालाची बाजार पेठ

  • अलीकडच्या काळात नाशिक शहरामध्येही मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्यांची स्थापना

  • दोन्ही शहरामध्ये लघु, मध्यम व अवजड उद्योग कारखाने, कृषी-विषयक संस्था यांचे जाळे मोठ्या प्रमाणात

  • या सर्व बाबींचा विचार करून आणि समृद्धी महामार्ग या माध्यमातून पुण्याला जोडण्यासाठी हा ग्रीन कॅरिडोअर प्रस्तावित

एक तृतीयांश खर्चात रेल्वेचा प्रकल्प मार्गी लागणार आहे. सार्वजनिक हिताचे प्रकल्प राबविताना दीर्घकालीन आणि स्वस्त पर्यायांचा विचार करण्याऐवजी महागडे प्रकल्प हाती घेण्यामागे कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तो गतीने मार्गी कसा लावता येईल, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केला पाहिजे.

- अमोल कोल्हे, खासदार

प्रकल्पाबाबत

  • प्रस्तावित पुणे-नाशिक कॅरिडोअरची लांबी १७८ किलोमीटर

  • ढोबळ मानाने प्रकल्पाचा भूसंपादनासह अपेक्षित खर्च २१,१५८ कोटी

  • साधारणत : २००० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार

थोडक्यात पार्श्वभूमी

  • रेल्वे मंत्रालयाकडून व्हीजन २०२० तयार

  • पुणे-नाशिक दरम्यान सेमी हायस्पीड द्रुतगती रेल्वेमार्ग बांधण्याचे नियोजन

  • या रेल्वे मार्गाची आखणी पूर्ण झाली असून केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारची त्यास मान्यता

  • रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम देखील सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com