
Diwali Festival 2025
Sakal
पिंपरी : परदेशांत राहणाऱ्या आप्तेष्टांना दिवाळीचा फराळ पाठविण्यासाठी भारतीय टपाल खात्याचा आधार असतो. पण, ‘टेरिफ’मुळे या वर्षी अमेरिकेसाठी ही सेवा बंद आहे. तर, इतर देशांसाठी हा उपक्रम सुरू असल्याची माहिती डाक अधिकाऱ्यांनी दिली. अमेरिकेला फराळ पाठवण्यासाठी खासगी कुरियरची सुविधा आहे. पण, त्याचे दर टपाल विभागाच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहेत.