

‘हाय-टेक’चा आयपीओ
सोमवारपासून खुला
मुंबई, ता. २१ः विविध औद्योगिक उपयोजनांसाठी आवश्यक असलेल्या हायड्रॉलिक फिटिंग्जच्या डिझाइन, उत्पादन आणि पुरवठ्याच्या व्यवसायात कार्यरत असलेल्या हाय टेक इंजिनिअर्स लि. कंपनीचा आयपीओ सोमवारी (ता.२४) खुला होणार असून, तो गुरुवारी (ता.२७) बंद होईल. या आयपीओसाठी प्रतिशेअर ५० ते ५३ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. किमान २८३ शेअरसाठी आणि त्यानंतर २८३ शेअरच्या पटीत बोली लावता येईल. या आयपीओमध्ये ६० कोटी रुपयांपर्यंतचे नवे शेअर, तसेच विद्यमान भागधारकांकडून १,४२,८९,४५० पर्यंतच्या शेअरच्या ऑफर फॉर सेल यांचा समावेश आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
चार दशकांहून अधिक काळाचा कार्यात्मक अनुभव असलेली ही कंपनी सध्या देशात सहा उत्पादन सुविधा केंद्र चालवते. ही सुविधा केंद्रे ठाणे, शिरवळ, कवठे, नाशिक आणि मध्य प्रदेशातील पीथमपूर येथे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.