
Bhama Askhed Dam
Sakal
आंबेठाण : भामा आसखेड (ता.खेड) धरणातून भामा नदीपात्रात चालू वर्षाच्या हंगामातील सर्वात मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे.१३३१२ क्युसेसने हे पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने करंजविहिरे ते धामणे या दोन्ही गावात दरम्यान असणाऱ्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे.