
"Highly Educated Fraudster Arrested in ₹2.46 Cr Scam in Pune"
Sakal
पुणे : पुण्यातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाची दोन कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षिताला सायबर पोलिसांनी हैदराबादमधून अटक केली. आरोपीने परदेशातील विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. इतकेच नव्हे तर तो ‘यूपीएससी’ची पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण असून, हैदराबादमधील विविध विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केल्याची बाब समोर आली आहे.