Lavani dancer Hindavi Patil crying after PMC removes Sahyadri Amruttulya board without notice in Pune’s Konark Park area : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा हिंदवी पाटील हिच्या ‘सह्याद्री अमृततुल्य’ या दुकानावर पुणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता ही कारवाई करण्यात आल्याचं हिंदवी पाटीलनं म्हटलं आहे. या कारवाईनंतर तिने नाराजी व्यक्त केली असून यावेळी ती भावूक झाल्याचंही बघायला मिळालं.