"ब्राह्मण समाजाने विनंती केली म्हणून..." कसब्यात आनंद दवे भरणार अर्ज - Kasba Bypoll Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba Bypoll Election

Kasba Bypoll Election : "ब्राह्मण समाजाने विनंती केली म्हणून..." कसब्यात आनंद दवे भरणार अर्ज

Kasba Bypoll Election : कसबा पोटनिवडणुक राज्यात चर्चेत आली आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. याठीकाणी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकारण चांगलच तापलं आहे. 

या कसबा पेठेतून काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर भाजप कडून हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाली. भाजपकडून टिळक कुटुंबात उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी दिली नाही त्यामुळे नाराजीचे वातावरण आहे. 

दरम्यान कसबा पोटनिवडणुकीत कोणत्याही पक्षाने ब्राह्मण समाजाला उमेदवारी न दिल्याने हिंदू महासभेने ही निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी अर्ज भरण्याची घोषणा केली आहे. उद्या (मगंळवार) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे दवे यांनी सांगितले आहे. खुल्या प्रवर्गाचा आवाज विधानसभेत पोहचवण्यासोबतच पुणेश्वराला मुक्त करणे तसेच स्वच्छ, सुंदर कसबा हे आपले ध्येय असल्याचे दवे म्हणाले. 

हिंदू समाजातील सर्व जातींना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. पुणे जिल्ह्यात २१ आमदार असताना प्रत्येक समाजाचे प्रतिनिधित्व असताना ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व का डावलले गेले, असा प्रश्न आनंद दवे यांनी भाजपला केला आहे. ब्राह्मण समाजाची मागणी हिंदू महासभा पर्यंत आल्यानंतर मी स्वत: रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला ही धोक्याची सुचना आहे. हिंदू महासंघाचा उमेदवार इथं निवडून येईल, अशी माझी खात्री असल्याचे दवे म्हणाले.