
Solapur News : मंगळवेढ्यात गैबीपीर ऊरूसाला आजपासून सुरवात
Solapur News : शहरातील हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान बनलेल्या गैबीपीर ऊर्सानिमित्त आज दि. 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ऊरुस कमिटीचे सरपंच प्रशांत गायकवाड यांनी दिली.
आज दि.21 रोजी 10 वा प्रवेशद्वाराचे उद्घाटन रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांच्या शुभहस्ते संचालक रामचंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे सायंकाळी 7 वा. कळसाची भव्य मिरवणूक बोराळे नाका येथून जेष्ठ नेते बबनराव अवताडे यांच्या शुभहस्ते जकाराया शुगर्सचे अध्यक्ष अॅड बी.बी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर,उपभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, तहसीलदार स्वप्निल रावडे, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, पोलीस निरीक्षक रणजीत माने, तलाठी संघटनेचे अध्यक्ष उमेश सूर्यवंशी, तलाठी समाधान वगरे, मानकरी अनिल पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
दि.22 रोजी पहाटे 5 च्या दरम्यान सागर फायर वर्क्स यांच्या वतीने होणाय्रा शोभेच्या दारू कामाचे उद्घाटन विष्णुपंत अवताडे यांच्या शुभहस्ते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे 22 फेब्रुवारी रोजी 10 वा. शरीफ सुतार यांच्या शुभहस्ते लेबर फेडरेशनचे संचालक सरोज काझी यांच्या अध्यक्षतेखाली महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.रात्री 7 वा जंगी कव्वाली चा मुकाबला आ. समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
याच वेळी खाटीक समाजाच्या वतीने भंडारखाना व नैवेद्य होणार आहे, गुरुवारी 23 फेब्रुवारी रोजी 4 वा.राष्ट्रवादी नेते भगीरथ भालके यांच्या शुभहस्ते खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांच्या अध्यक्षतेखाली जंगी कुस्त्याचे आयोजन करण्यात आले.
रात्री 7 वा जंगी कव्वाली चा मुकाबला पांडुरंग कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते व धनश्री परिवाराचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे शुक्रवारी दि. 24 जंगी कुस्तीचे मैदान अवताडे शुगरचे अध्यक्ष संजय अवताडे यांच्या शुभहस्ते व शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष अॅड सुजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. शनिवारी 25 रोजी कुराणखणी व मौलूदाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या निमित्ताने लेझर शो व केरळच्या कलाकाराचे नृत्य देखील होणार आहे