
Hinjawadi IT Employee
Sakal
पिंपरी : सरकारने खासगी कंपन्यांमधील कामाचे तास आठवरून बारा करण्याचा निर्णय घेतला आहे. यास हिंजवडीतील फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज संघटनेने विरोध केला आहे. सध्या नोकरीवर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून जास्त काम करून घेतल्यास नवे कर्मचारी नेमण्याची गरज कंपनीला पडणार नाही. त्यामुळे नोकऱ्यांची संख्या कमी होईल, अशी भीती संघटनेने व्यक्त केली.