हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरु करा - भाजप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरु करा - भाजप

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरु करा - भाजप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बालेवाडी : बाणेर येथील बालेवाडी फाटा येथे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम जलद गतीने सुरु करावे यासाठी भारतीय जनता पार्टी कडून आमदार चंद्रकांत पाटील व खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो चे भूमिपूजन होऊन अडीच वर्ष झाले असूनही कामांमध्ये प्रगती न झाल्यामुळे हे काम जलद गतीने सुरू करावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलन प्रसंगी खासदार गिरीश बापट यांनी मेट्रोच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत मेट्रोसाठी मागच्या आठवड्यामध्ये बाराशे कोटींचा निधी केंद्र सरकारने राज्य सरकारला मंजूर केला असल्याचेही सांगितले.

हेही वाचा: टीईटी, नेट परीक्षा आता एकाच दिवशी : तारखांचा गोंधळ संपणार कधी?

मेट्रो साठी 98%जागा ताब्यात मिळाली आहे, निधी ही उपलब्ध असून हे सरकार काम करत नसल्याचे त्यांनी सांगितले.त्याचबरोबर आत्ताच्या आघाडी सरकारचा गृहमंत्री तुरुंगात असून जनतेचे रक्षण करणारे ज्याने कायदा आणि सुव्यवस्था राखायची ते पोलिसच फरार असल्याने राज्यामध्ये काय स्थिती आहे हे सांगत आघाडी सरकारवर टीका केली.

तर नगरसेविका स्वप्नाली सायकर,नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेवक अमोल बालवडकर तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी ही मेट्रोचे काम जलद गतीने करावे यासाठी आंदोलन करत असल्याचे सांगत,आघाडी सरकारच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध व्यक्त केला.तर आघाडी सरकार हे भारतीय जनता पार्टीने केलेले एकही काम पूर्ण होऊ देत नाही ते दोन तोंड असणाऱ्या गांडूळा सारखेच आहे, काम करते असे जनतेला दाखते प्रत्यक्षात मात्र कामांमध्ये खो घालत असे मत भाजपचे गणेश कळमकर यांनी व्यक्त केले. यावेळी या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी कोथरूड विधानसभा मतदार संघ प्रभाग क्र. 9 बाणेर बालेवाडी नगरसेवक कार्यकर्ते, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे,सचिन कोकाटे, पुनीत जोशी, प्रल्हाद सायकर,प्रकाश बालवडकर,शशिकांत बालवडकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top