
पिंपरी: आयटीनगरी हिंजवडीतील वाहतूक समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी येथील रस्त्यांचे चौफेर जाळे वाढविणे गरजेचे आहे. सध्याच्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि नवे-प्रशस्त रस्ते विकसित करणे ही काळाची गरज आहे. सध्या हिंजवडीत विविध प्रशासकीय यंत्रणांमुळे सर्व रस्ते विकसित करणे अडचणीचे ठरत आहे. पण, उत्तम ‘कनेक्टिव्हिटी’शिवाय आयटी पार्कमधील परिस्थिती बदलणार नाही हे वास्तव आहे.