
Pune Rain Traffic Problem
esakal
हिंजवडी : हिंजवडी आयटी पार्क परिसरात गुरुवारी (ता.१८) दुपारच्या सुमारास तासभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सर्वच रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक ठप्प झाली. प्रामुख्याने माण-हिंजवडी रस्ता, लक्ष्मी चौक, विनोदेनगर ते भूमकर चौक भुयारी मार्ग आदी परिसरांत वाहनाच्या दूरवर रांगा लागल्याने हजारो आयटी कर्मचारी कोंडीत अडकले.