हिंजवडीत भूसंपादन रखडले

सुधीर साबळे
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजित नव्या रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी अडकले आहे. 

मर्सिडीज बेंझ शोरूम ते माणदरम्यान नवा सहा किलोमीटरचा रस्ता प्रस्तावित आहे. मात्र, केवळ दोन किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित चार किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी एमआयडीसीला १४.४ हेक्‍टर जमिनीची आवश्‍यकता असून, त्याचे संपादन ‘पीएमआरडीए’कडून करण्यात येणार आहे. मात्र, ही जमीन अद्याप ‘एमआयडीसी’ला मिळाली नसल्याने रस्त्याचे काम अडकून पडले आहे. या ठिकाणी सहा लेनचा रस्ता प्रस्तावित आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शिवाजी व भूमकर चौकातील वाहतूक कोंडी कमी होईल.

दीड वर्षापासून सुरू आहे काम
नवीन रस्त्याचे काम सुमारे दीड वर्षापासून सुरू आहे. संपूर्ण रस्ता तयार करण्यासाठी हवी असणारी जागा 
वेळेत मिळाली असती, तर आतापर्यंत हा रस्ता तयार झाला असता. आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी कमी झाली असती. 

दुसऱ्या रस्त्याचे काम सुरू
एमआयडीसीने चांदे-नांदे ते घोटावडे फाटा यादरम्यान अडीच किलोमीटर रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. घोटावडे फाट्यापर्यंत जाणारा हा रस्ता साडेसात किलोमीटर अंतराचा असून, त्यापैकी अडीच किलोमीटर एमआयडीसी, अडीच किलोमीटरचा रस्ता पीएमआरडीए आणि उर्वरित रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आयटी पार्कमधील फेज तीन आणि एकमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. पर्यायी रस्त्यांचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही. तोपर्यंत आयटी पार्कमधील मेट्रोचे काम सुरू करू नका, अशी सूचना पीएमआरडीएकडे करण्यात आल्याचे समजते. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या कामाला आयटी पार्कमधून सुरवात झाली तर या भागातील वाहतुकीची समस्या गंभीर होणार आहे.

मर्सिडीज बेंझ ते माणदरम्यान ‘एमआयडीसी’कडून करण्यात येत असणाऱ्या रस्त्यासाठी जागेची आवश्‍यकता आहे. ‘पीएमआरडीए’ने त्याचे भूसंपादन करून द्यावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या ठिकाणची जमीन एमआयडीसीच्या ताब्यात आल्यानंतर उर्वरित रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात येणार आहे.
- नीलेश मोढवे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी, हिंजवडी आयटी पार्क

आयटी पार्कमधील वाहनांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण व्हायला हवे. सध्या या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढत आहे. तो कमी करण्यासाठी सध्या सुरू असणारे काम लवकर पूर्ण करायला हवे. 
- केदार तुंगीकर, हिंजवडी. 

Web Title: Hinjewadi Land Acquisition