
Hinjewadi
sakal
हिंजवडी : वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने हिंजवडी-माण, लक्ष्मी चौक, मारुंजी रस्त्यांच्या रुंदीकरणाला प्रशासनाकडून अद्याप मुहूर्त न लागलेला नाही. दोन महिने उलटूनही रस्त्यांवरचा राडारोडा पडून आहे. त्यामुळे, स्थानिक नागरिक आणि आयटीयन्स वैतागले असून रस्त्यांवर हळूहळू पुन्हा अतिक्रमणे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षात रस्त्यांच्या कामांना मुहूर्त लागणार तरी कधी, असा सवाल आयटीयन्ससह स्थानिक रहिवासी विचारत आहेत.