

Hinjewadi Shivajinagar Metro Line 3 Plans Foot Over Bridges To Connect Major IT Companies With Metro Stations In Pune
sakal
पिंपरी : हिंजवडी-माण ते शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गावर पादचारी पूल तयार करून आयटी कंपन्यांची कार्यालये थेट स्थानकाला जोडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. तसे आवाहन करण्यात आले होते आणि पाच कंपन्यांशी संपर्क झाला होता. त्यापैकी एका कंपनीने प्रतिसाद दिला असून चार कंपन्यांकडून उत्तराची प्रतीक्षा आहे.