
पिंपरी : भूसंपादन न झाल्याने हिंजवडीतील रस्त्यांच्या निविदा रद्द करण्याची नामुष्की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळावर (एमआयडीसी) ओढावली आहे. काही महिन्यांपूर्वी हिंजवडीतील रस्त्यांचे रुंदीकरण तसेच नवीन उड्डाणपूल उभारण्यासाठी ‘एमआयडीसी’ने ६५० कोटींचे प्रस्ताव मांडले होते. त्यातील शिवाजी चौक ते स्मशानभूमी रस्त्याचे सहापदरीकरण व लक्ष्मी चौक ते हिंजवडी उड्डाणपूल या दोन प्रकल्पांसाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली. मात्र, या प्रकल्पांचे भूसंपादनच रखडल्याने जवळपास ५७ कोटींच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.