

Hinjewadi Shivajinagar Metro News When Will Pune Metro Open as Prime Minister Modi Baramati Tour Is Postponed
esakal
पुणे : हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्ग ३ च्या उद्घाटनाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना पुन्हा अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ३ नोव्हेंबर रोजी नियोजित बारामती दौरा पुढे ढकलण्यात आल्याने मेट्रोच्या शुभारंभाबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या दौऱ्यात मेट्रोचे उद्घाटन होण्याची अपेक्षा होती. आता १६ नोव्हेंबर ही संभाव्य तारीख चर्चेत असली, तरी दौरा किंवा उद्घाटनाबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.