Maan Hinjewadi Metro : ४ नोव्हेंबरपासून माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर तब्बल २ लाख ६५ हजार प्रवाशांचा प्रवास

Hinjewadi Shivajinagar Metro Passenger Update : दिवाळीच्या खरेदीसाठी मेट्रोला नागरिकांची पसंती मिळाली असून, माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर अवघ्या काही दिवसांत अडीच लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. पिंपरी मेट्रोनेही पाच लाखांचा टप्पा पार केला.
Hinjewadi Metro Passenger Update

Hinjewadi Metro Passenger Update

sakal

Updated on: 

हिंजवडी: रस्त्यांवरील वाहतूक कोंडीत अडकण्याची चिंता नाही की बाजारपेठेत पोहोचल्यावर वाहन लावण्यासाठी जागा शोधण्याची धावपळ... दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या हिंजवडी, माण आणि परिसरातील नागरिकांना यंदा मेट्रोच्या रूपाने दिलासा मिळाला. नव्याने सुरू झालेल्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावर चार नोव्हेंबरपासून एकूण दोन लाख ६५ हजार ६५० प्रवाशांनी प्रवास केला.

Loading content, please wait...