Village Road: रस्त्याअभावी माणुसकीची कसोटी! वृद्ध महिलेस डोलीतून चार किलोमीटरची जीवघेणी पायपीट राजगड तालुक्यातील दुर्गम घिसर (हिरवेवस्ती) येथील घटना

Elderly Woman Carried 4 Km on Bamboo Stretcher Due to No Road : राजगड तालुक्यातील हिरवेवस्ती येथे रस्ता नसल्याने ७१ वर्षीय आजारी महिलेला नातेवाइकांनी डोलीतून चार किलोमीटर डोंगरवाटेने वाहून नेले. घटनेमुळे मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
Family members carry a 71-year-old woman on a bamboo stretcher along a four-kilometre hill trail in Hirvevasti.

Family members carry a 71-year-old woman on a bamboo stretcher along a four-kilometre hill trail in Hirvevasti.

esakal

Updated on: 

वेल्हे: स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही ग्रामीण भागातील अनेक वाड्या-वस्त्यांपर्यंत रस्त्याची सुविधा पोहोचलेली नाही, हे वास्तव राजगड तालुक्यातील घिसर येथील हिरवेवस्ती येथे समोर आले आहे. रस्ता नसल्यामुळे आजारी ७१ वर्षीय रमाबाई भागू हिरवे यांना उपचारासाठी चक्क डोलीतून चार किलोमीटर डोंगरवाटेने वाहून न्यावे लागल्याची हृदयद्रावक घटना रविवार (ता.१५) रोजी घडली. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत असताना एका वृद्ध महिलेला उपचारासाठी अशी जीवघेणी पायपीट करावी लागणे, ही केवळ दुर्दैवी घटना नसून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.

Loading content, please wait...