
"Final Tribute to Mehendale: Eminent Scholars Pay Respects"
Sakal
पुणे : ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे भाचे सत्येन वेलणकर यांनी मंत्राग्नी दिला. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव भारत इतिहास संशोधक मंडळात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह साहित्यिक, इतिहास अभ्यासकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.